Ad will apear here
Next
वासिंद येथे नागसेन बुक डेपोतर्फे भारतीय संविधान अभियान


वासिंद :
भारतीय संविधानाविषयी जनजागृती व्हावी, ते घराघरात पोहोचावे म्हणून कल्याण येथील नागसेन बुक डेपोच्या वतीने शहापूर तालुक्यातील वासिंद येथील क्षण मंगल कार्यालयात ‘भारतीय संविधान घराघरात’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी ‘भारतीय संविधान आणि वास्तव’ या विषयावर ओबीसी, संघर्ष समन्वय समितीचे राज्य सरचिटणीस राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘भारतीय संविधान माहिती असणे ही काळाची गरज आहे. असे कार्यक्रम पोलिसांनी, आमदारांनी, खासदारांनी आयोजित केले पाहिजेत,’ असे सांगून संविधानाविषयी विविध उदाहरण व अनुभव राजाराम पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 



अंतर्मनाच्या सामर्थ्याचा आविष्कार असलेल्या हिप्नॉटिझमवर आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रम, प्रात्यक्षिके संमोहनत सिकंदर जरीपटके यांनी सादर केली. या वेळी नितीन गिरी उपस्थित होते. 

‘भारतीय संविधान हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणे, हा माझा उद्देश असून ही माझी सामाजिक जबाबदारीसुद्धा आहे. म्हणून मी विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहे,’ असे नागसेन बुक डेपोचे सोमनाथ भोसले यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZTOBT
Similar Posts
शहापूर तालुका कलाध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शहापूर : शहापूर तालुका कलाध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. वासिंद येथील सरस्वती विद्यालयात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाचे विभागीय सह-कार्यवाह विलास सेसाणे, ठाणे जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुरेश सापळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली
शहापूर येथील तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी शहापूर : इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी, फिरणे या नियोजनात सर्वजण गुंतलेले असताना शहापूर कुणबी महोत्सव समिती, वासिंद येथील कुणबी प्रतिष्ठान व वासिंद विभागातील तरुणांनी मात्र गरिब व गरजूंवर मायेची ऊब पांघरत नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले आणि समाजासमोर एक आदर्श घालून दिला.
सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप शहापूर : सिद्धार्थ फाउंडेशन या संस्थेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ‘एक वही एक पेन’ अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत मिळालेल्या वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाट्या या शालेय साहित्याचे वाटप वासिंद (जिजामाता नगर) येथील रायकरपाडा जिल्हा परिषद शाळेत आठ जुलैला करण्यात आले
वासिंद येथे विद्यार्थी भारतीचे राज्यस्तरीय शिबिर उत्साहात शहापूर : विद्यार्थी भारती संघटनेतर्फे दर वर्षीप्रमाणे याही वर्षी ‘अपडेट टू अपग्रेड’ या संकल्पनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील वासिंद येथील भातसई गावातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत तीन ते नऊ जून २०१९ या कालावधीत राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language